लोकमान्य व अष्टपैलु व्यक्तिमत्त्व; ओमप्रकाशजी मुंदडा

ज्यांनी कठोर परिश्रमाने यश मिळवले. आयुष्यात लोकसंग्रह, ज्ञानसंग्रह, वास्तूसंग्रह अशा वेगवेगळ्या खात्यांमध्ये सारखीच शिल्लक टाकली. कठोर परिश्रम करण्याची जिद्द असेल आणि अंगी प्रामाणिकपणा असेल तर मनुष्य यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकतो, याचे मुर्तीमंत उदाहरण. शहराच्या भौतिक विकासाचा साक्षीदार आणि साथीदार असणारे अगदी नम्र , शांत ,मृदु भाऊ उपाख्य ओमप्रकाश मुंदडा यांचा आज वाढदिवस.
भाऊंकडे भक्कम वैचारीक बैठक, उत्तम सामाजिक जाण आणि अफाट लोकसंग्रह आहे. आज त्यांचा वाढदिवस. वयाची 58 वर्षे अतिशय यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेली आहेत. साधी राहणी परंतु अतिशय उच्च विचार असे त्याचें जीवन प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे. भाऊ म्हणजे उच्च विचारी व गरिबांची जाणीव ठेवणारे तर आहेतच त्यांचे स्वप्न हे विचारांच्या पलीकडे आहे.
▶️ वाढदिवसनिमित्त पूर्व संध्येला घेतलेली मुलाखत….
▶️ प्रकाशभाऊ तुम्ही शून्यातून विश्व कसे निर्माण केले?
यावर बोलताना भाऊ आवर्जून सांगतात , जिद्द, मेहनतं आणि अथक परिश्रमाची जोड असेल तर कोणतीही गोष्टं अशक्य नाही. सुरवातीच्या काळात आडत व्यवसायात मी होतो, त्यानंतर tv केबल, इलेक्ट्रिक गिझर ची विक्री मी करत असे. वेळोवेळी अनेक अडी-अडचणींचा सामना मी कायमच करत राहिलो ,पण चिकाटी कधी सोडली नाही .अडचणी या आपल्याला बळकट करण्यासाठी असतात. प्रत्येक परिस्थिती काहीतरी शिकवून जाते. जेव्हा लँड developer म्हणून सुरुवात झाली तेव्हा अनेक नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या. गाव चांगले कसे विकसीत करता येईल यावर मी नेहेमीच विचार करत असे. जर तुम्ही हातातले कोणतेही काम न चुकता पूर्ण केले तर नक्कीच यशस्वी व्हाल. प्रत्येकाचे एक सूंदर घर असावे हे स्वप्नं असते, आम्ही त्याविचाराने मुंदडा बिल्डर्स ची 1989 मध्ये स्थापना केली .आज अनेक प्रोजेक्ट्स आपण केलेत, तेथे लोकं गुण्यागोविंदाने राहत आहे. सर्व सोयी सुविधा , उत्कृष्ट बांधकामामुळे , तसेच पक्के रस्ते , गार्डन विकसित केल्यामुळे लोक समाधानी आहेत. लोकांच्या भरीव साथीमुळे छोटेसे रोपटे आज मुंदडा बिल्डर्स च्या रूपाने वटवृक्ष झाले आहे. प्रामाणिकपणा, संयम , नम्रता आणि सचोटीच्या जोरावर आज आम्ही यश मिळवले आहे. सुरुवात छोटी असो की मोठी , वाटेत न थंबता कार्य करणे महत्वाचे आहे, यश जरूर मिळेल.
▶️ व्यावसायिक जीवनात सामाजिक बांधिलकी तुम्ही कशी जपली?
खरे पाहता समाजामुळे आणि आजूबाजूच्या लोकांमुळे आपण घडत असतो . ज्या गावांत आपण मोठे झालो त्याचे देणं आपण लागतो. फक्त व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून आपण यशस्वी होऊ शकत नाही अथवा तसे झाले झाले तरी ते यश खूप काळ टिकत नाही. आपल्या सोबत काम करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुःखात आपण सोबत असले पाहिजे. त्याच्या प्रगतीचा पूर्ण विचार आपण निःस्वार्थीपणे केला पाहिजे. ही नाती कायम आपण जपायला हवी. आम्ही होतकरू, गरीब विद्यार्थ्यासाठी मुंदडा फाउंडेशन तर्फे अनेक मराठी व इंग्लिश मीडियम शाळा चालवतो. आपला देश सुपर पावर होण्यासाठी सुशिक्षित लोकांची खूप गरज आहे. शिक्षणामुळे देशाची नक्कीच प्रगती होते. जवळ जवळ 3000 विद्यार्थी आमच्या मराठी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच अनेक मजुरांची मुलेही आपल्या शाळेत शिकत आहेत. ही मुले नक्कीच परिवाराची आधारकाठी बनत आहे.
मुंदडा वाटिका या नावाने आमच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये गार्डन विकसित करत आहोत. तेथे मैदान, प्ले कोर्ट, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक अश्या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे मुलांना चांगले आरोग्य लाभेल तसेच खेळांमध्ये ही प्रगती होईल.
सर्व सांस्कृतिक कार्यक्रम गार्डन मध्ये केले जातात, जेथे नक्कीच लोकं एकत्र येऊन सहभागी होतात.
अनेक मंदिर आपल्या ओपन स्पेसेस मध्ये बनले आहेत त्यामुळे वडीलधाऱ्या लोकांची चांगले सोय होऊन सांस्कृतिक जतन केले जाते.
▶️ मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कुल च्या माध्यमातून तुम्ही नव्या पिढीला कसे सज्ज करत आहात?
आज अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सोबत शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज झाली आहे. चांगले शिक्षण मिळाल्यास माणूस जगात कोठेही टिकू शकतो. आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवुन शाळेची स्थापना केली आहे. पाया जर लहानपणीच पक्का झाला तर भविष्यात काहीही अवघड जात नाही. आम्ही लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो. प्रत्येक विषयांची कन्सेप्ट क्लियर करण्यावर आमचा खूप फोकस असतो.100 कॉम्प्युटर्स च्या 2 लॅब्स आम्ही बनविल्या आहेत. लहानपनापासूनच आम्ही मुलांना JAVA, C , C++ चे प्रशिक्षण देत असतो. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वेबसाईट्स डिझाईन केल्या आहेत. विज्ञानाचे सखोल धडे देण्यासाठी आम्ही प्रशस्त लॅबोरेटरी बनवली आहे.
आम्ही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये Experimental learning , Entrepreneurship , General knowlege , Extra curriculum activities , sports & cultural activities चा समावेश केलेला आहे.
आज आमचे विध्यार्थी IIT , AIIMS, COEP ,PICT सारख्या नावलेल्या कॉलेजमध्ये देखील आहे. रिझल्ट खूप चांगला येत असल्याने पालकही समाधानी आहेत. MTS , NTS , OLYMPIAD , SCHOLERSHIP सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक national record holder आहेत. कोरोनाकाळातही
E-learning आम्ही खूप चांगल्या पद्धतीने विकसित केले. ही यशस्वी घौड दोड अशीच सुरू राहील.
▶️ भविष्यातील आपले काय प्लांनिंग आहे?
मुंदडा पार्क या आठ मजली प्रोजेक्ट नंतर आम्ही आता मुंदडा सिटी हा 1000 घरांचा प्रोजेक्ट लाँच केला आहे. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न साकार होईल या भावनेने आम्ही माफक किमतीत उत्कृष्ट क्वालिटीचे रो हाउसेस बनवीत आहोत. सध्या नव्या सर्व प्रोजेक्ट्स मध्ये waste plastic management वर भर टाकण्यात येणार आहे. ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट वर ही आम्ही काम करणार आहोत. तसेच गावातील लोकांसाठी एक सुसज्ज अशी जिम आम्ही बनविणार आहोत. सध्या आम्ही जवळपास 500 मजुरांना रोजगार देतो व आपल्या शिक्षण संस्थांमध्ये सुमारे 250 कर्मचारी आहेत. रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध करण्याचे आमचे प्रयत्न राहतील. सर्व गुरुजन , मित्र परिवार, नातेवाईक , राजकीय मित्रमंडळी, आमचे ग्राहक आणि आमची टीम यांचे खूप खूप आभार .