आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुटीर रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व राज्य शासनाकडे तालुक्यासाठी ०२ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. या मागणीची त्वरीत दखल घेत आमदार चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी पारोळा कुटीर रूग्णालयासाठी १ व बहादरपुर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १ अश्या दोन रूग्णवाहिका प्राप्त झाल्या असुन त्याचे लोकार्पण आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आ.पाटील यांनी अँब्युलन्स चालकाला चावी प्रदान करून याचे लोकार्पण केले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, बाजार समिती संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, गोविंदराव पाटील, शेतकी संघ संचालक सुधाकर पाटील, दगडु पाटील, वैद्यकीय अधिक्षक डाॕ.योगेश साळुंखे, सुनिल पवार, चालक प्रसाद राजहंस, बापु मराठे, पंकज मराठे, पत्रकार विश्वास चौधरी, संजय पाटील,राकेश शिंदे व आदी मान्यवर उपस्थित होते.
