जे.डी.सी.सी.बँकेच्या निवडणुकीत अमोल पाटील यांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल!

जळगाव (प्रतिनिधी) जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, जळगांव जि.जळगांव पंचवार्षिक निवडणूक सन २०२१ – २०२६ करिता पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा मा.रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, संचालक संजय पवार, माजी संचालक डाॕ.सतिष देवकर, संचालिका तिलोत्तमा पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, एरंडोल तालुका समन्वय समिती अध्यक्ष रमेशआण्णा महाजन, माजी.जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, हिंमत पाटील, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजु चौधरी, शालिक गायकवाड, मा.जि.प. सदस्य कैलास चव्हाण, पंचायत समिती सभापती रोकडेसर, उपसभापती विवेक पाटील, माजी.उपसभापती अनिल महाजन, माजी.सभापती मोहन सोनवणे, मधुकर पाटील, कासोदा सरपंच महेश पांडे, दिपकदादा वाणी, जळु माजी सरपंच रवि जाधव, नगरसेवक अतुल महाजन, कुणाल महाजन, सुनिल चौधरी, चिंतामण पाटील, संजय गांधी निराधार समिती सदस्य छोटुभाऊ चौधरी(भगत), कुणाल पाटील, राज पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.