धनदिप बहुउद्देशीय मंच तर्फे गरजू महिलांना साडी वाटप!

0

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे भल्या भल्यांची आर्थिक गाडी रुळावरून घसरली आहे. त्यात सततच्या पावसामुळे भर पडली. अस्मानी संकट सर्वांवर कोसळले त्याला कष्टकरी सुद्धा अपवाद राहिले नाही. हाताला काम उरले नाही, कामाला दाम उरला नाही. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सदोदित सतावीत असताना शिक्षिका छाया इसे यांच्या संकल्पनेने धनदिप बहुउद्देशीय मंच तर्फे नवरात्रोत्सवात नव्या साड्यांचे वाटप करण्यात आले.
सर्वसाधारणपणे नवरात्रोत्सवात आदिमायेची खणानारळाने ओटी भरण्यात येते. त्याला फाटा देत व माणुसकी जपत छाया ईसे यांनी नव्या साड्या देण्याचे आवाहन सर्व महिला शिक्षकांना केले,त्यानुसार त्यांच्याकडे अनेक साड्या जमा झाल्या. त्या सर्व साड्या हिंगोणे येथील गरीब कष्टकरी महिलांना वाटप करण्यात आल्या. त्या साड्या घेत असतांना त्या गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नवरात्रोत्सवात आपल्यालाही नवीन साडी परिधान करायला मिळेल याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. खरोखर सर्व शिक्षक भगिनींनी माणुसकी जपत गरिबांना माणुसकीचा हात दिला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.ए.धनगर यांचे मार्गदर्शन लाभले व साडी वाटपासाठी छाया इसे,रत्नाताई भदाणे,विद्यादेवी कदम,छायाताई सोनवणे,क्रांती पाटील,नूतन पाटील,अशोक इसे,मनोहर पाटील,डाँ कुणाल पाटील यांनी मेहनत घेतली

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!