अतिवृष्टी व अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतीचे होणार तात्काळ पंचनामे!

0

▶️ आमदार अनिल पाटील यांची मंत्र्यांशी चर्चा; मुंबई ला जाऊन घेणार प्रत्यक्ष भेट

▶️ मतदारसंघातील नुकसानीचा मांडणार अहवाल
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर मतदार संघात २ ऑक्टोबर पर्यंत सर्वदूर अतिवृष्टी व अवकाळी यामुळे कृषि क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करावेत असा आग्रह आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.
अमळनेर मतदारसंघातील शिरूड,भरवस,पातोंडा,नगाव,
मारवड,वावडे,अमळगाव,अमळनेर,शेळावे,व बहादरपूर या सर्वच १० ही मंडळात अतिवृष्टी तर कुठे अवकाळीमुळे शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.काही भागात बांधावर जाऊन आमदारांनी नुकसानीचा आढावा घेतला.सर्वच पिकांना कमी जास्त प्रमाणात फटका बसला असल्याने शेतकरी हवालदिल झालेला असतांना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला यासाठी आमदार अनिल पाटील यांनी कृषिमंत्री दादाभुसे,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडवेट्टीवार,पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मतदारसंघातील नुकसानीची माहिती दिली, संबंधित यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतील असे मंत्र्यांनी सांगितल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
आमदार पाटील सोमवारी(४ ऑक्टोबर) मुंबई येथे कृषी, मदत व पुनर्वसन,महसूल या मंत्र्यांची भेट घेऊन अतिवृष्टी व अवकाळीमुळे अमळनेर मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव,धुळे,नंदुरबार या भागातील शेतीचा नुकसाणीबाबतचा अहवाल सादर करणार आहेत.शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!