शितल अकॅडमी करतेय पारोळ्यातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची संजीवनीचे काम!-ज्योती संदानशिव

पारोळा(प्रतिनिधी) येथे 28 सप्टेंबर रोज़ी शितल अकॅडमी मध्ये गणपती फेस्टिवल निम्मित घेतलेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हसवे गावाच्या लोकनियुक़्त सरपंच सौ.ज्योती सतीश संदानशिव व पारोळा ग्रामीण च्या तलाठी माधुरी वारुळेकर,टाइगर किड्स इंटरनॅशनल स्कूल पारोळा चे प्रिन्सिपल रूपाली पाटील व सर्व शितल अकॅडमी स्टाफ़ व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कोरोना दुसरी लाटे नंतर शितल अकॅडमीचा पहिला बक्षिस समारंभ पार पडला.सर्व विद्यार्थ्यानी सर्व स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेतले. प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अकॅडमी ने ज्या सुविधा दिलेल्या आहेत,त्या तुम्हाला मुंबई ,पुण्यासारख्या शहरामध्ये ही मिळणार नाही तर विद्यार्थ्यानी भरपूर उपयोग करावा.अकॅडमीने वाचनालय,ग्रूप डिस्कशन रूम , डीबेट रूम,डिजिटल थेरी,मूव्ही रूम याची उत्तम सुविधा केली आहे.