आ.अनिल पाटील यांच्या सौजन्याने शुक्रवारी महा लसीकरण शिबीर!

▶️ सानेगुरुजी शाळेत भव्य आयोजन,शिबिर सर्वांसाठी खुले
अमळनेर (प्रतिनिधी) संपूर्ण कोरोना कालावधीत न डगमगता जनतेच्या काळजीपोटी सतत क्रियाशील राहणारे आ.अनिल पाटील यांनी लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी महालसीकरण शिबिर शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे आयोजित केले आहे.
सदर शिबीर सानेगुरुजी विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहे,विशेष म्हणजे सदर शिबीर 18 प्लस गटातील सर्व व्यक्तींसाठी खुले राहणार असून याठिकाणी कोव्हीशिल्ड लसीचे डोस सर्वाना देण्यात येणार आहे,सदर महा शिबिराची जोरदार तयारी आमदारांच्या टिमने सुरू केली असून मागेल त्याला लस हेच आमदारांचे उद्दिष्ट असणार आहे,सदर शिबिरासाठी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंदाचे अनमोल सहकार्य लाभणार आहे,सकाळी 9 वाजेपासून सदर शिबीरास प्रारंभ होणार असून शिस्तीप्रमाणे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या धोरणानुसार लसीकरण करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन कोरोना मुक्त मतदारसंघ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आ अनिल पाटील यांनी केले आहे.
▶️ कोरोना काळात आमदारांनीचे घेतले होते पहिले शिबीर
साधारपणे दीड वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ज्यावेळी अमळनेर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला त्यावेळी आमदार अनिल पाटील यांनी याच सानेगुरुजी शाळेत सर्व तज्ञ डॉक्टरांना एकत्रित करून अनेक दिवस शिबिराच्या माध्यमातून शहर व ग्रामिण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली होती त्यावेळी झालेल्या शिबिरामुळे सर्दी व खोकला आणि ताप असलेल्या रुग्णांना शोधून त्यांचे विलगिकरण करणे सोईचे झाले होते,संपूर्ण जिल्ह्यात आमदारांच्या या उपक्रमाचे कौतुक झाले होते,त्यानंतर देखील आमदारांनी जनतेसाठी सतत कार्यरत राहून अतिशय मोठे योगदान कोरोना कालावधीत दिले.याशिवाय कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर देखील आमदारांनी प्रशासनाशी संपर्कात राहून जास्तीत जास्त लस तालुक्याला उपलब्ध करून दिल्या आहेत,आता लसीकरणापासून वंचित राहिलेल्यासाठी याच सानेगुरुजी शाळेत महा लसीकरण शिबीर त्यांनी आयोजित करून मोठा आधार जनतेला दिला आहे.