राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्या बाबत एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
▶️ शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या सुचना
त्या म्हणाल्या की,ग्रामीण भागात ५ ते १२ चे वर्ग सुरु होणार असून शहरी भागात ८वी ते १२ चे वर्ग सुरु होणार आहे.
टास्क फोर्सच्या नियमांचे पालन करुन शाळा सुरु केल्या जातील,शाळेत कोणत्याही खेळांना परवानगी राहणार नाही,विद्यार्थ्यांची उपस्थिती महत्त्वाची नाही, पण पालकांची संमती गरजेची असेल.
ज्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरल्या त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे,विद्यार्थ्यांना उलट्या,जुलाब,ताप, पोटदुखी असेल तर पालकांना,शिक्षक यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील,विद्यार्थ्यांना घरात आल्यावर कपडे बदलणे,मास्क,याबाबत सूचना दिल्या जातील, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची,सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येईल,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन लस घ्यावे हे SOP मध्ये आहे