अमळनेर औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण निधीसाठी केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांना ॲड.ललिता पाटील यांचे निवेदन

अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मंगरूळ येथील औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरण व वाढीसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्तरा वरून निधी मिळण्यासाठी वसाहतीचे चेअरमन जगदीश चौधरी व त्यांचे सहकारी संचालक मंडळ यांच्या मागणी नुसार,अंमळनेर सहकारी औद्योगिक वसाहतीची स्थापना होऊन शासकीय जमिनीवर उद्योगासाठी 1980 मध्ये प्लॉट वितरित झालेले आहेत सदर शासकीय जागेवर लहान-मोठे सर्व 75 उद्योग कार्यरत होऊन अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झालेल्या आहे संस्थेला कुठल्याही प्रकारचे उत्पादन नसल्यामुळे उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा रस्ते लाईट पाणीपुरवठा ड्रेनेज इत्यादी सुविधा पुरवण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
केंद्रशासनाने कोरोना काळ असतानाही MSME सेक्टर साठी दिलेल्या मदतीचा हात व शासकीय धोरणास अनुसरून कोरोना काळातही उद्योजकांनी आपले उद्योग चालवून कामगारांना सतत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे परंतु उद्योजकांना मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे उद्योगासाठी लागणारे मूलभूत सुविधां उपलब्ध न झाल्यामुळे या वसाहतीतील उद्योगाचा विकास खुंटलेला आहे.
म्हणूनच सहकारी संस्थेतर्फे विनंती की उद्योगाचा विस्तार व वाढ करण्यासाठी केंद्र शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी व मूलभूत सुविधां मिळाव्यात अशी विनंती ॲड.ललिता पाटील , बाजार समिती संचालक पराग पाटील यांनी केली.