महेश पाटील सर यांना ‘स्मार्ट टिचर’ पुरस्कार!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील टोळी येथील बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था संचलित ” कृष्णाई माऊली आदिवासी आश्रमशाळा तरडी येथिल प्राथमिक शिक्षक महेश रामदास पाटील यांना रेडिओ मेरी आवाज व लिटील हेल्प या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ‘स्मार्ट टिचर’ पुरस्कार देण्यात आला आहे , पाटील यांनी वृक्षारोपण करणे , वृक्षसंवर्धन करणे शालेय तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना स्मार्ट टिचर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे , ग्रामीण भागातील शिक्षकाला पुरस्कार मिळाल्याने त्यांचे शिक्षक संघटनांकडून कौतुक होत आहे .