पारोळा येथे शिवसेने तर्फे पत्रकारांना फर्स्ट एड किटचे वाटप

पारोळा (प्रतिनिधी)शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री ना.श्री.एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतुन,आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार्याने तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा.डाॕ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या शुभहस्ते पारोळा तालुक्यातील पत्रकार बांधवांना फर्स्ट एड किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी. पाटील सर, पत्रकार विश्वास चौधरी, भिका चौधरी, रावसाहेब भोसले सर, रमेश जैन, योगेश पाटील, विशाल महाजन, संजय पाटील, राकेश शिंदे, निलेश जोशी, प्रसाद पाटील, दिलीप सोनार, प्रकाश पाटील, दिपक भावसार, प्रकाश पाटील, अशोक ललवाणी, विवेक कुलकर्णी, विकास चौधरी आदी उपस्थित होते. यासमयी पत्रकार बांधवांच्या वैद्यकीय मदतीसाठी व सहकार्यासाठी प्राधान्याने सदैव अग्रेसर असुन आपल्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना वैद्यकीय मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहन अमोल पाटील यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना केले.