राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज!

0

मुंबई (वृत्तसंस्था) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे,यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.तसेच अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे,असे हवामान विभागाने सांगितले

➡️ कशी असणार पुढील स्थिती

▶️ आज 11 सप्टेंबरला – रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून – पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे

▶️ 12 सप्टेंबरला – रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे – तसेच पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे

▶️ 13 सप्टेंबरला – पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे – तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अलर्ट दिला आहे

▶️ 14 सप्टेंबरला – पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे – तसेच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली

तसेच नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे,असे हवामान विभागाने सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!