सामाजिक बांधिलकी; श्रीराम फाउंडेशनचा शेतकऱ्यांना मदतीचा हात!

जामनेर (प्रतिनिधी) श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी चक्रीवादळ व सोसाट्याच्या पावसाने नुकसानग्रस्त ओझर, हिंगणे, रामपुर तांडा, मोयखेडा दिगर, देवळसगाव, नांद्राहवेली, तोडापुर, कापुसवाडी, लहासर, शेळगाव, तळेगाव, चिंचोली, फत्तेपूर या गावांना भेट दिली. यावेळी श्रीराम पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास व त्यावर झालेले कर्ज फेडण्याची आशा यावर पावसाने व वादळाने पाणी फेरले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली व भरपाई मिळावी यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी याना ३५℅अनुदान देऊन नवीन ठिबक खरेदीसाठी मदतीचा हात पुढे केला असून शासनाचे अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना देणार असून शेतकऱ्यांना मोफत किंवा जास्तीचे मिळणार असून याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन शासकीय विश्राम गृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीराम पाटील यांनी केले आहे.
