बोरी नदीत बुडणाऱ्या व्यक्तीला उंदिरखेडेच्या तरूणांनी दिले जीवदान!

पारोळा(प्रतिनिधी) काल संध्याकाळी तामसवाडी येथील बोरी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाचे सर्व 15 दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला श्री तीर्थक्षेत्र नागेश्वर रस्त्यावरील फरशी पुलावर मोठया प्रमाणात पाणी वाहत होते आज सकाळी सोमवती अमावस्या निमित्ताने भाविक मोठया प्रमाणावर दर्शनासाठी नागेश्वर येथे जात होते परंतु पुलावर असणारे पाण्यातून पायी जात भाविकांनी दर्शन घेण्यासाठी वाट निवडली दर्शन घेऊन परत येत असताना पारोळा येथील न्यू बालाजी नगर येथील रहिवाशी विजय जीवन पाटील आणि त्यांचा मुलगा प्रवीण विजय पाटील यांचा पाय घसरला परंतु विजय जीवन पाटील हे पुलावरून खाली पाण्यात पडले आणि फरशी पुलाच्या पाईप मध्ये अडकले त्याचवेळी उंदिरखेडे येथील तरुण कल्पेश विठ्ठल शिंदे,गणेश बुधा पाटील,सागर शेषराव शिंदे आणि दोन भिल्ल समाजातील 2 मूलांनी त्यांना मोठ्या शिताफीने त्या पाईपातून बाहेर काढले. तोपर्यंत विजय पाटील यांच्या छातीत पाणी गेल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते त्यांच्या छातीतून पाणी काढून तरुणानी त्याना प्रथमोपचार दिले आणि खाजगी वाहनाने पारोळा येथे उपचारासाठी रवाना केले.
या कार्यामुळे उंदिरखेडे येथील त्या व्यक्तीचे प्राण वाचवणारे तरुणांचे सर्व क्षेत्रांतून कौतुक होत आहे.
