दिव्यांग शिक्षकांचा आ.डॉ.सुधीर तांबे यांच्याकडून गौरव!

जळगाव (प्रतिनिधी)शिक्षक दिनानिमित्ताने सर्व शिक्षकांचा गौरव केला जातो परंतु दृष्टी नसलेल्या शिक्षकांचा सन्मान केला जात नाही ही खंत विचारात घेऊन आ.डॉ.सुधीर तांबे यांनी जळगाव दौऱ्यावर असताना जळगाव मधील दृष्टी नसलेल्या शिक्षकांना आमंत्रित केले.
ज्यांना दृष्टी नाही जे जग बघू शकत नाही अशा शिक्षकांचा समाजाने प्रतिवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करावा आणि समाजाचे त्यांच्याकडे लक्ष वेधावे या हेतूने आ.डॉ.सुधीर तांबे यांनी त्यांचा गुणगौरव करणारा उपक्रम राबविला.
गोदावरी हायस्कूल जळगावचे शिक्षक ज्यांना दृष्टी नाही असे संजय बडगुजर, प्रवीण महाजन, मा. सुशील महाजन यांचा डॉ.तांबे यांनी सत्कार केला. यावेळी प्रामुख्याने मा. शिक्षणाधिकारी बी.जे पाटील, प्रा सुनील गरुड, शैलेंद्र (छोटू) खडके आदींसह मान्यवर उपस्थित होते.