राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस!

पुणे (वृत्तसंस्था) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार – येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे
त्यामुळे आज रविवारी कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
▶️ आज ५ सप्टेंबरला- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे
▶️ ६ सप्टेंबरला – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे
▶️ ७ सप्टेंबरला – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
▶️ ८ सप्टेंबरला- पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे – असे हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी सांगितले.