सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचा करणखेडेला निरोप समारंभ संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) पंचायत समितीत कार्यरत असलेले सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांची नुकतीच संगमनेर पंचायत समिती येथे बदली झाली.त्यांचा निरोप समारंभ करणखेडे गावाचे माजी सरपंच गणेश शांताराम गुरव व ग्रामस्थांनी आयोजित केला होता.
याप्रसंगी वायाळ साहेबांचा सत्कार गावाचे माजी उपसरपंच गणेश शांताराम गुरव व माजी सरपंच सौ.अल्काबाई युवराज मनोरे यांनी केला तसेच समाधान मैराळे सर यांचा सत्कार कवी शरद धनगर यांनी केला. किशोर ठाकरे यांचा सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष पंकज मनोरे यांनी केला. मुडी दरेगाव हिंगोंणे दरेगाव तसेच बोरी नदी परिसरातील व तालुक्यातील सरपंचांनीही वायाळ सरांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
येथील माजी उपसरपंच तथा राणाजी बँडचे संचालक शांताराम काशिनाथ गुरव व सौ.सुमनबाई शांताराम गुरव यांनी चांदीची वृक्ष प्रतिमा देऊन संदीप वायाळ यांचा विशेष सत्कार केला यावेळी युवराज मनोरे, अनिल लंके,अनिल पारधी,भरत पाटील रवींद्र गुरव व गावातील,परिसरातील ग्रामस्थ महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.