केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या जाचक नियमात शासनाने केले बदल: आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नांना यश!

0

यावल ( प्रतिनिधी ) शासनाने २०२० ते२०२१ या वर्षासाठी हवामानावर आधाराती फळपिक विमा योजनेत केळीच्या निकषात बदल करावे अशी मागणीचा पाठपुरावा यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी केन्द्रीय कृषी मंत्री नरेन्द्र तोमर तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे व माजी केन्द्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे केल्याने या मागणीला यश आले असुन शासनाने केळी पिकविम्याच्या जाचक नियमात अखेर बदल केले आहे. या संदर्भात आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी केन्द्रीय कृषीमंत्री नरेन्द्रसिंग तोमर व राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना लिखित पत्र देवुन जळगाव जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकरी यांच्या केळी पिकांची लागवडीचे भौगोलीक व नैसर्गिक स्थितीचा अभ्यास केल्यावर दर तिन वर्षांनी बदल केले जात असे , प्रधानमंत्री फळपिक विम्याच्या योजनेच्या निकषात बदल करावे अशी मागणीचा सातत्याने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्याने अखेर राज्य शासनाने आमदार शिरीष चौधरी यांची मागणी मान्य करीत , जळगाव जिल्ह्यातील यावल ,रावेर , चोपडा या क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी मंडळींना या प्रधानमंत्री फळपिक विम्यातुन नव्याने हवामानावर आधारीत प्रधानमंत्री फळपिक विम्यातुन योजनेत पुश्नच बदल करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील जवळपास ७० हजाराच्यावर असलेल्या केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे . दरम्यान राज्य शासनाने२०१९मध्ये हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत पुढील २०२०व२०२१या वर्षाकरिता निकषात बदल केले होते . शासनाने केलेले हे केळी पिक विम्याच्या या अत्यंत जाचक निकषामुळे प्रधानमंत्री पिक विम्याच्या योजनाचे लाभ मिळणे अवघड झाले असल्याने यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी या प्रश्नाचा केन्द्रीय कृषी मंत्री नरेन्द्रसिंग तोमर, माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार , राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे , राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातुन केळी शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या जाचक अटीशर्तीत बदल करीत जैसे थे करण्यात यश मिळवले आहे . या मुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!