पत्नीच्या निधनानंतर पतीनेही घेतला जगाचा निरोप

▶️ चिंचोली गावातील घटना; परिसरास शोककळा व हळहळ
▶️ पती पत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील चिंचोली गावातील राहणाऱ्या पती व पत्नीचे एकाच दिवशी दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडल्याने परीसरात हळहळ व्यक्त केले जात आहे .चिंचोली तालुका यावल येथील रहिवासी असलेले माजी पंचायत समिती यावलचे सदस्य गणपती भाऊराव साठे यांच्या पत्नी कोकीळाताई गणपती साठे वय ७० यांचे दि. २३ बुधवार रोजी दुपारी दिड वाजता ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकुन त्यांचे पती माजी प.स.सदस्य गणपती भाऊराव साठे वय ७५ यांची छातीत दुखू लागल्याने त्यामुळे त्यांनाही तात्काळ जळगाव येथे एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .परंतु रात्री आकरा वाजता ही त्यांचे पत्नी च्या पाठोपाठ काही तासांनीच ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पती पत्नी चा एकाच दिवशी काही तासाच्या अंतरावर निधन झाल्याने चिंचोली व परीसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. दोघा पती पत्नी वर उद्या दि. २४ गुरूवार रोजी सकाळी अकरा वाजता चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात प्रगतशील शेतकरी सुनिल साठे तर मन्यारखेडाचे ग्रामसेवक अनिल साठे हे दोन मुले तर दोन विवाहित मुली ; सुना नातवंडे ; असा परीवार आहे. सकाळी आज दिनांक 24 रोजी अकरा वाजता पती पत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.