रत्नागिरी येथे राज्य जि.प. व पं. स.सदस्य असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

यावल ( प्रतिनिधी )जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ची राज्यकार्यकारणी दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली . रत्नागिरी येथील सभागृहात संपन्न झालेल्या राज्य जिल्हा परिषद सदस्याच्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गौरे पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शक उदय बने हे होते.या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत आबा शिंदे , सुभाष दादा पवार, सुभाष घरत, सौ रेखाताई कंटे, सौ जयश्रीताई सासे, असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, दत्ता अण्णा साळुंके, संजय मडके, देवडकर ,उस्मानाबाद जिल्हा परिषद. चंद्रकांत कळंबे पाटील, जय मंगल जाधव, औरंगाबाद विभागातुन नितीन नकाते .सोलापूरचे रोहन बने. रत्नागिरी, कोल्हापुर व सातारासह महाराष्ट्र राज्यातील असोसिएशनचे प्रतिनिधी सदस्य इत्यादी जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये बैठक व दोन दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष , आरोग्य व बांधकाम सभापती उदय बने यांच्या पुढाकाराने ही राज्य कार्यकारणीची कार्यशाळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणातमध्ये पार पडली .या बैठकीच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचे आपआपल्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यासंदर्भात येणारे विषय व जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य यांचे अधिकार सुरक्षित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी या दोनदिवसी कार्यशाळा बैठकीत उपास्थित सर्व सदस्यांना आपण जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात केलेल्या विकास कार्याची विस्तृत माहीती व ग्रामीण पातळीवर या विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी व त्यावर तोडगा कसा काढता येतो या संदर्भात मौलीक मार्गदर्शन केले .