अमळनेरच्या आर्मी स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने

अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाइन योगासनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. योग तथा क्रिडा शिक्षक आर ए घुगे व योग शिक्षक व्ही डी पाटील यांनी विविध प्रकारचे योगासने करत विद्यार्थ्यांना व पालकांना प्रेरित केले. तसेच योगासनांचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन विविध प्रकारची योगासने केली. यावेळी प्राचार्य पी एम कोळी, सुभेदार मेजर नागराज पाटील, जेष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड आदींनी योगदिनाच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आर्मी स्कुलचा माजी विद्यार्थी तथा नाशिक येथील एच.पी.टी आर्ट्स अँड आर.यु.के. सायन्स कॉलेज चा विद्यार्थी सुदर्शन गांगुर्डे याने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या इंग्रजीतील माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.
