एक हात मदतीचा; अनु.आश्रम शाळा कर्मचारी संघटना तर्फे मृत कर्मचार्यांच्या कुटुंबांना सद्भावना मयत निधी वितरित

अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटना यावल प्रकल्प अंतर्गत अमळनेर तालुक्यातील आश्रम शाळा कर्मचारी कै.सरला साहेबराव पाटील (पिंपळे), कै.हेमकांत अशोक पाटील(बोळे तांडा), कै.विशाल संदांनशिव(बोळे तांडा) यांच्या कुटुंबियांना संघटनेमार्फत ‘सद्भावना मयत निधी’ योजने अंतर्गत प्रत्येकी 31,000 रू आर्थिक मदत प्रकल्प अधिकारी श्रीमती विनिता सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आली,यावेळी संघटनेचे पदाधिकारी श्री मनोज ठाकरे (जिल्हाध्यक्ष) श्री अविनाश अहिरे (कोषाध्यक्ष) सदस्य श्री संजय गोसावी (सद्भावना निधी समिती सदस्य) ,श्री उदय पाटील,श्री संदीप शिसोदे,(जिल्हा कार्यकारणी सदस्य) जाकीर शेख(जिल्हा कार्यकारणी सदस्य) ,श्री विलास पाटील(मुख्याध्यापक आश्रम शाळा बोळे तांडा), श्री संदीप पाटील श्री रवींद्र साळुंखे,श्री शरद भामरे, श्री कल्याण पाटील, श्री योगेश पाटील, श्री विकास पाटील ,श्री पवन लांडगे, श्री भाऊराव चव्हाण ,श्री नाना खैरनार,श्री सतीश पाटील आदी उपस्थित होते.

▶️ या कुटुंबांना मिळाली मदत
या अगोदर कै.योगेश पंडित बाविस्कर उच्च माध्यमिक शिक्षक बोरज अँटी,कै. सुनिल श्रीधर महाले अधीक्षक डोणगाव,कै. गुलाब नवल सुलताने शिक्षक कर्जाने,कै. अजय खंडोजी चंदनखेडे मुख्याध्यापक अंतुर्ली,कै. बापूराव प्रकाश शिंदे हातेड, मिलिंद बैसाणे स्वयंपाकी धानोरा,कै. विष्णू नारखेडे शिक्षक जामन्या पाडा,कै. सरला साहेबराव पाटील स्वयंपाकी पिंपळे,कै. राजेश विश्वनाथ मोरे प्रयोगशाळा परिचर सनपुले आश्रमशाळा,यांच्या कुटुंबीयांना सद्भावना मयत निधी वितरित करण्यात आली आहे.