जिजाऊ नगर येथे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकूरोडवरील जिजाऊ नगर भागात सामजिक सभागृहाच्या बांधकाम कामाचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शहरातील पालिका प्रभाग 7 मध्ये जिजाऊ नगर येथे होत असलेल्या सामाजिक सभामंडप बांधकाम अंदाजित किंमत 15 लाख रुपये कामाचे भूमिपूजन अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक संदीप घोरपडे, श्रीराम काटकर, महेश पाटील, दीपक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी के अहिरे होते, कार्यक्रमास नगरसेवक विवेक पाटील, माजी नगरसेवक राजु फाफोरेकर, अँड यज्ञेश्वर पाटील, दिलीप पाटील, पंकज पाटील, शिवाजी सोनवणे, प्रवीण वाघ, आर.एस.सोनवणे, विजय साळुंखे, सागर पाटील, पद्माकर बडगुजर, कृष्णा बोरसे, प्रवीण बडगुजर, हर्षल पाटील, दिलीप जाधव, वसंत सूर्यवंशी, संदीप खैरनार, संजय मोरे, ज्ञानेश्वर मोरे, अरुण बोरसे यांच्यासह सहकार नगर, जिजाऊ नगर, रेऊ नगर, वृंदावन नगर येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत सुर्यवंशी यांनी केले.

