जि. प. व पं. स.च्या विविध विकास कामांच्या राष्ट्रवादीच्या तक्रारी ना.हसन मुश्रीफ,ना.पवार व ना. धनंजय मुंडे कडे

0

▶️ कार्यवाही संदर्भात फोन केला होता चौकशी लावण्याचे आश्वासन दिले
यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मार्च २०२०ते २०२१या कोवीड१९च्या संचारबंदी काळातील झालेल्या विविध विकास कामांची तात्काळ चौकशी करावी अशा मागणीची लिखित तक्रार जिल्हा परिषदचे मुख कार्यकारी अधिकारी जळगाव यांचेकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी केली आहे . या संदर्भात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी जिल्हा परिषद आणी पंचायत समिती यावल यांना दिलेल्या लिखित तक्रारीत म्हटले आहे की , यावल तालुक्यात जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या माध्यमातुन अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली असून, या विकास कामांबाबत गावपातळीवरून अनेक ग्रामस्थांच्या व विविध सामाजीक व राजकीय पक्षाच्या पदाधिकारींच्या सदरची ही कामे निकृष्ट प्रतिची झाल्याबाबत तक्रारी असतांना ही प्रशासकीय यंत्रणेकडुन या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संबंधीत ठेकेदारांशी हात मिळावणी करून निकृष्ट कामांची बिले अदा करण्यात आली असुन , यावल पंचायत समितीमार्फत झालेल्या या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच तालुक्यातील डोंगर कठोरा व डोंगरदे शिवारातील नदीपात्रातील पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत झालेली नाला बांधाची कामे अत्यंत खराब प्रतिची साहीत्य वापरून बांधकाम करण्यात आले असुन या पावसाळ्यात हे कामे वाहुन जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे डोंगर कोठारा गावापासून ते यावल फैजपूर रोड पर्यंत झालेले डांबरीकरण रस्त्याचे काम हाती निष्कृष्ट प्रतीचे डांबर वापरल्याने डांबराचे प्रमाण कमी असल्याने येथे पावसाळ्यामध्ये हा रस्ता पुन्हा खड्डे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही 
 त्याच प्रमाणे राज्य शासनाकडुन तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये आदीवासी वस्ती पाड्यांवर झालेल्या कोवीड१९च्या संचारबंदी काळातील परिस्थितीचा फायदा घेत झालेले सर्व कामे ही अती घाईगर्दीने व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कोणतेही संबंधित अभियंत्याने कामाचे निरीक्षण न करता अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे हात मिळवणी करून  निष्कृष्ट दर्जाचे कामांची बिले अदा करण्यात आलेली  दिसून येत आहे  या विविध विकास कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा तसे न झाल्यास कायदेशीर पद्धतीने न्यायालयाचे सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे . तसेच यावल तालुक्यातील जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत येणाऱ्या आरोग्य व शिक्षण विभागाच्या विविध योजनेतील नवीन इमारती बांधकाम व दुरुस्ती तसेच संरक्षण भिंतीच्या झालेल्या किंवा प्रगतीवर असलेल्या निष्कृष्ट दर्जाचे कामाची चौकशी व्हावी अशा आशयाचे आज यावलचे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील यांना पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदीवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष एम .बी . तडवी सर , राष्ट्रवादी तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष निवृत्त धांडे तक्रार निवेदन देण्यात आले या प्रसंगी पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील ही प्रामुख्याने उपस्थित होते . दरम्यान तक्रारकर्ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना . हसन मुश्रिफ , सामाजीक न्यायमंत्री ना . धनंजय मुंडे यांना देखील चौकशीच्या मागणीची निवेदने ईमेलद्वारे पाठविली असुन , राज्याचे अर्थ व उपमुख्यमंत्री ना. अजीत पवारांशी त्यांचे दुरध्वनी व्दारे बोलणे झाले असुन , ना .पवार तात्काळ चौकशीचे आदेश देतो असे आश्वासन दिले आहे .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!