हिंगोणा जवळ नविन पेट्रोल पंप बांधकामासाठी शेतकरी वहीवाटीचे अवैध खोदकाम; राष्ट्रवादीची कार्यवाहीची मागणी

0

यावल (प्रतिनिधी) सुनील गावडे
तालुक्यातील हिंगोणे गावा जवळील बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर महामार्गावर एका पॅट्रोल पंपाच्या बांधकामासाठी शेतकरी व मजुरांचा वापराचा रस्ता खोदल्याने रस्ता अरुंद झाल्याने भविष्यात मोठे संकट होणार असून या सर्व कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी तक्रार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे शहर अध्यक्ष कामराज घारू यांनी तहसीलदारांकडे केली आहे . या संदर्भात कामराज घारू यांनी दिलेल्या लिखित निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर महामार्गावर नदीपात्राच्या मध्यभागी शेतकरी व शेतमजुरांच्या येण्याजाण्यासाठी रस्ता होता , या ठीकाणी नविन पॅट्रोल पंपाचे बांधकाम करण्यात येत असुन , संबंधीत बांधकाम करणाऱ्यांनी शेतकरी वहीवाटीचा सुमारे १००ते १५० फुट खोल रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी चारी पाडुन तेथील माती हे पॅट्रोल पंपाच्या आवारात भरावासाठी टाकण्यात येत आहे . सदरील हा प्रकार पंप संचालकांच्या बांधकामाच्या गोंधळामुळे झाला असुन , यामुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुर यांना खोदलेल्या चारीमुळे मोठा खड्डा निर्माण झाला असुन या मार्गावरून वावरतांना बैलगाडी व इतर वाहन या चारीच्या मार्गाने गेल्यास मोठे अपघाताची शक्यता निर्माण झाली असुन , या चारीतील खोदलेल्या खड्डयामुळे अपघात होवुन मोठया प्रमाणावर शारीरिक इजा पोहचल्यास व त्यामुळे होणारे नुकसान व गंभीर दुखापतीमुळे शेतकऱ्यांचे वैद्यकीय खर्चाचा आर्थिक भुर्दंड सोसावे लागु शकता , सदरच्या या अवैध खोदकामा विषयी हिंगोणा , हंबर्डी , सांगवी बु॥ , आणी भालोद परिसरातील शेकडो शेतकरी तसेच जागृत नागरीकांच्या अनेक तोंडी तक्रारी असुन , तरी महसुल प्रशासनाने संबंधीत पॅट्रोल पंप चालक व मालक यांना स्वताच्या आर्थिक व्यवहारासाठी खोदलेल्या त्या नदीपात्रातील चारीस शेतकऱ्यांच्या वापरासाठी पुर्वरत करून देण्यास आदेशीत करावे तसे न झाल्यास आपण पाच ते सहा दिवसांनंतर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासच्या माध्यमातुन आंदोलन करू असा ईशारा नायब तहसीलदार आर डी पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे यावल शहराध्यक्ष कामराज घारू यांनी दिला आहे या प्रसंगी तहसील कोषागार विभागाचे मुक्तार तडवी ही उस्थित होते .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!