अमळनेर येथे प्रभाग क्रं १४ मधे डांबरीकरण काम सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना काळातही येथील प्रभाग क्रं १४ मधे डांबरीकरण कामाचा धडाका सुरू असून आतापर्यंत दिड कोटीच्या वर कामे झाली आहेत. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता पाटील यांचा पाठपुरावामुळे प्रभाग क्रं १४ मधे भुयारी गटारी झालेल्या विद्या विहार कॉलनी, भालेराव नगर ते झामी चौक, सप्तश्रुंगी कॉलनी., प्रसाद नगर, अशोकरत्न नगर, संताजी नगर, गूरूकूपा कॉलनी., भालेराव नगर, आर.के.नगर, मुंदडा नगरचा मुख्य रस्ता इ.भागात कोरोना काळात निधीची कमतरता असतांना देखील दिड कोटीच्या वर कामे करत डांबरीकरण कामाचा सपाटा लावला आहे.यावेळी स्थानिक नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील, रवि पाटील, देसाई आबा, विलास पाटील, साहेबराव पाटील, देवरे सर, धर्मेंद्र खैरनार, रविंद्र शिंदे, संजीव पाटील, संजय पाटील, शांताराम पाटील, देसाई बापू, ईश्वर महाजन, रघुनाथ पाटील, दशरथ जाधव, शिव पाटील, विनोद पाटील, रोहित तेले, प्रमोद पाटील, भैय्या साळुंखे, श्रीकांत गोसावी, कल्पेश साळुंखे, किरण अहिरे, महेश पाटील, प्रविण वाघ उपस्थित होते.
