जळगांव जिल्हा आफ्रोह टीम तर्फे आदिवासी विभागा मार्फत निघालेल्या अन्यायी जी.आर.ची होळी

जळगाव (प्रतिनिधी) आज रोजी शिवानंदजी सहारकर सर प्रदेशाध्यक्ष आफ्रोह यांचे सुचने नुसार जळगांव जिल्हा आफ्रोह टीमने आदिवासी संघर्ष समीती व्दारे आयोजित ७/६/२०२१रोजी न्या .हरदास समीतीच्या शिफारसी नुसार महाराष्ट्र राज्य आदिवासी विभागा मार्फत निघालेल्या अन्यायी ७/६/२०२१ च्या जी.आर.ची होळी कार्यक्रमात आपली आफ्रोह टीम ने सहभागी होवून जी.आर.ची होळी केली.
यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे डॉ. शांतारामदादा सोनवणे, ऍडव्होकेट गणेश सोनवणे, नितीन कांडेलकर व इतर प्रतिनिधी तसेच ऑफ्रोह चे प्रदेश कार्यकारीनी सदस्य व जिल्हा कमीटी मार्गदर्शक श्री.लीलाधरजी ठाकूर साहेब ,प्रदेश कार्यकारीनी सदस्य श्री.जितेंद्र वाघ,जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर , जिल्हा कार्यकारीनी पदाधिकारी सचिव सुरेश नन्नावरे,कोशाध्यक्ष लालचंद साळुंखे संघटक दिनेश ठाकूर व इतर पदाधिकारी व सदस्य तसेच आदिम संघटनेचे सहयोगी श्री वासुदेव ठाकूर, शैलेंद्र ठाकूर,चंद्रकांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आफ्रोह संघटनचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले.
