राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी वना महाजन तर उपाध्यक्ष ललित सोनवणे यांची निवड

पारोळा (प्रतिनिधी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी पारोळ्यातील माळी समाजातील सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष वना दामू महाजन यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी तर ललित सोनवणे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील माजी खासदार वसंतराव जीवनराव मोरे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाने शहराध्यक्ष कपिल चौधरी यांनी एका बैठकीत निवड जाहीर केली त्यानंतर डॉ सतीश पाटील यांच्या हस्ते दोघांना नियुक्तीपत्र देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते तथा सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ चे संचालक पराग वसंतराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील तालुकाध्यक्ष यशवंत पाटील युवक अध्यक्ष योगेश रोकडे आदीजण उपस्थित होते त्यांच्या या निवडीबद्दल माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील तसेच माजी खासदार वसंतराव मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या