इंधवे येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील इंधवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार, दि. २२ मे २०२१ पासून कोरोना लसीकरण केंद्रास सुरूवात झाली. लसीकरणाचा शुभारंभ सरपंच जितेंद्र पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
४५ वय वर्षापुढील नागरिकांना या केंद्रावर लस देण्यात आली. कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस जिराळीचे पोलीस पाटील श्री. भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक योगेश पाटील उपस्थित होते. इंधवे-जिराळी गावातील ग्रामस्थांचा लसीकरणास उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.