मा.आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते खडके येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व विठ्ठल रुख्मणी मंदिर कळस पूजन

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या पंचवार्षिक अमळनेर विधानसभा मतदार संघात विकासाची गंगोत्री आणून गावागावात अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत, व्यायाम शाळा, आदीवासी वस्तीमध्ये देवमढी, प्रत्येक समाजासाठी सामाजिक सभागृह किंवा समाजमंदिर, रस्ते, रस्त्यावरील छोटे मोठे पूल,चौक सुशोभीकरणासह इतर महत्वाची कामे अमळनेर मतदार संघात केली होती. यातूनच काल खडके ता.अमळनेर येथे मा आमदार शिरीष चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व विठ्ठल रुख्मणी मंदिराचा कळस पूजन गावकरी तथा पंचक्रोशीतील नागरिकांच्या हजेरीने पार पडला.
दिलेला शब्द पूर्ण केल्याने त्या बद्दल नागरिकानी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे स्वागत आणि सत्कार करून गावक-यांनी विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच भिवराज भिल, उपसरपंच मच्छिंद्र पाटील, ह भ प भगवान पाटील महाराज, ह भ प योगेश महाराज धामणगावकर यासह आसाराम पाटील,गणेश पाटील ,राजू पाटील,दिलीप पाटील,जयसिंग पाटील, सर्व ग्रा प सदस्य निसडी येथील रवींद्र पाटील सर्व ग्रामस्थ ,शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचे सर्व सदस्य आदी कार्यक्रमास हजर होते.
