आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांना कोरोना योद्धा २२ वे सन्मानपत्र!

पारोळा (प्रतिनिधी) येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना कोरोना योद्धा म्हणून आणखी एक बहुमान मिळाला असून मातोश्री द्रोपदा बबन पठारे चरिटेबल ट्रस्ट पुणे तर्फे २२वे सन्मान पत्र प्राप्त झाले आहे.
कोरोना बाधितांसाठी भावसार सरांनी आतापर्यंत आपल्या निवृत्ती वेतनातून तब्बल ७० हजार रुपयांचे योगदान राज्य,राष्ट्र,विविध संस्था, संघटना व कुटीर रुग्णालयाला लोकसहभागातून सुविधा साठी दिले असून समाज जागृती, प्रबोधन व मार्गदर्शन देखील करीत असतात.
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते समाजोपयोगी विविध उपक्रम राबवत असतात. यामुळेच त्यांना २० पुरस्कार मिळाले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावसार सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत !
