भूषण महाजन यांची महात्मा फुले युवा दलाच्या जिल्हा संघटकपदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी भूषण नामदेव महाजन यांची महात्मा फुले युवा दल जिल्हा संघटकपदी नुकतीच निवड करण्यात आली,तसे नियुक्तीपत्र महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश शिंदे यांनी दिली आहे.
महात्मा फुले युवा दलाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समाजातील विद्यार्थी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या हितासाठी महात्मा फुले युवा दल हे कार्यरत आहे.