ईडीने दाखल केला अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा!

0

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने सुद्धा एंट्री केली आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्यात आले आहे. तसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे.
▶️ अनिल देशमुख यांची हायकोर्टात अपील
100 कोटी वसुली आरोपांची प्राथमिक तपास करत सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायधीश एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!