प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

मंगळवार,11 मे 2021
▶️ म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा
▶️ ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता ‘कोवॅक्सिन’ची निर्मितीही महाराष्ट्रात होणार; कोविन पोर्टलमध्ये आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार
▶️ शिक्षण विभागाच्या सर्वेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनासाठी 83.13 टक्के शाळा तयार
▶️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार; भेटीत काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष
▶️ महाराष्ट्रात 5,90,818 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 44,69,425 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 76,398 रुग्णांचा मृत्यू
▶️ जालना शहरात रात्री दोन गटात जुन्या वादातून दगडफेक, पोलिसांचा हवेत गोळीबार, या वेळी दोन पोलीस जखमी, 27 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
▶️ भारतात 37,10,896 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,90,21,207 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,50,025 रुग्णांचा मृत्यू
▶️ पुण्यात ऑक्सिजन दुर्घटना टाळण्यासाठी उचलले ‘हे’ मोठे पाऊल, ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यासाठी 111 पथके, पुणे जिल्ह्यातील 629 रुग्णालयांमध्ये ऑडिट होणार
▶️ बिहार-यूपी सीमेवर कोरोनाचा कहर; बक्सरमध्ये गंगेच्या काठावर पाण्यात दिसले 40 मृतदेह, प्रशासनाचा दावा- हे मृतदेह यूपीतून वाहत आले
▶️ मुंबईत सेल्फीवरून पती-पत्नीमध्ये वाद, विक्रोळी रेल्वेस्थानकावर पत्नीने रेल्वेसमोर उडी मारुन केली आत्महत्या; कॅमेर्यात कैद झाला मृत्यू.