डॉ.बी.जे.हिंगे यांचे दुःखद निधन!

मालेगांव (प्रतिनिधी) तालुक्यातील एरंडगाव येथील मूळ रहिवाशी डॉ.बी.जे.हिंगे (84) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. उत्तम प्राध्यापक, संशोधक आणि प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिध्द नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.अशोक भामरे यांचे ते सासरे होत.