एक हात मदतीचा:नानाश्री प्रतिष्ठान तर्फे ४५ मजूर कुटुंबांना तांदूळ वाटप !

चोपडा (प्रतिनिधी) अंकलेश्वर ब-हाणपूर महामार्गाच्या शेजारी चिलिंग सेंटर जवळ लॅाकडाऊनमुळे अडकलेल्या छत्तीसगड राज्य व विदर्भातील सुमारे ४५ कुटुंबांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.मुख्य प्रश्न पोटाची खळगी भरण्याचा होता.हाताला काम नाही लहान मुलांसह कुटुंब कसं पोसायचा हाच प्रश्न या कुटुंब प्रमुखांपुढे होता.
ही बाब रोटरॅक्ट क्लबचे माजी अध्यक्ष सागर नेवेंच्या लक्षात आली.’संकट समयी धावून जाणे हाच खरा माणूसकी धर्म..’ या उक्ती प्रमाणे त्यानी सांगताच नेहमीच नानाश्री प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून अडल्या नडलेल्याची सेवा करण्यात तत्परता बाळगतात, त्या अनुशंगाने त्या कुटुंबांना तांदुळ वाटप केले. यावेळी नानाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पत्रकार श्रीकांत नेवे,सचिव रुपेश नेवे,सदस्य सतिष नेवे,राजेंद्र नेवे,सागर नेवे, व सौरभ नेवे उपस्थित होते.