भा.ज.पा.युवा मोर्चा तर्फे आयोजित अमळनेर येथे रक्तदान शिबीर संपन्न!

अमळनेर (प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आदरणीय आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या राज्यात रक्तसाठा कमी आहे. या पार्श्वभूमीवर रक्त संकलन करणे खूप आवश्यक व अंत्यत गरजेचे आहे. सदर बाब लक्षात घेऊन अमळनेर भाजपा युवा मोर्चा तर्फे सामाजिक दायित्व म्हणून विधायक अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करून युवा वर्गाला आदरणीय मा.आ स्मिताताई उदय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आव्हान करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५४ बॅग रक्तदान केले. व राज्याच्या कठीण वेळी सामाजिक भान ठेवत रक्तदान करून छोटासा हातभार लावला. याप्रसंगी जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, ॲड ललिताताई पाटील, पंचायत समितीचे मा.सभापती शाम अहिरे, तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर माजी सभापती प्रफुल्ल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग पाटील, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, सरचिटणीस राकेश पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज भोई, सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील, भूषण देवरे, जगदीश पाटील यांचेसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.