उमेश पाटील महाराष्ट्र युथ ऑयडॉल पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई तर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान सभारंभात अमळनेर तालुक्यातील एकलहरे गावाचे युवक उमेश पाटील याला राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडाॅल अवॉर्ड या पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.
उमेश यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असुन आपल्या व्याख्यान च्या माध्यमातून समाज जागृती काम करत असतो. या कार्य ची दखल घेत त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कारामुळे एकलहरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातुन कौतुक अभिनंदन होत आहे.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ही सरकार मान्य संस्था असुन ती गेल्या २१ वर्षे पासुन समाजातील गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्ती सन्मानित करत आहे.
