रविवार, 25 एप्रिल 2021

▶️ भारत बायोटेकने जाहीर केले कोव्हॅक्सिनचे नवे दर: राज्यांना प्रत्येक डोससाठी मोजावे लागणार 600 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी प्रतिडोस 1200 रुपये दर

▶️ आयपीएल 2020: कोलकाता टीमने 20 ओव्हरमध्ये 133 धावा केल्या, प्रत्युत्तरात विजयी झालेल्या राजस्थान रॉयल्सच्या 18.5 ओव्हरमध्ये 4 बाद 134 धावा

▶️ महाराष्ट्रात 6,94,480 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 34,68,610 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 63,928 रुग्णांचा मृत्यू

▶️ अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे विधान

▶️ लॉकडाउनमुळे व कडक निर्बंधांमुळे राज्याचे नुकसान किमान 82 हजार कोटी रुपये राहील; स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केला अंदाज

▶️ भारतात 26,74,287 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,40,78,081 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,92,310 रुग्णांचा मृत्यू

▶️ कोविड सेंटरमधून 30 रुग्णांनी पलायन केले, पळून गेलेल्या रुग्णांविरोधात फौजदारी कारवाई होणार; यवतमाळमधील घाटंजी येथील धक्कादायक घटना

▶️ ऑक्सिजनसंबंधीत वस्तू आणि उपकरणांवर पुढचे 3 महिने कस्टम ड्यूटी नाही, लसीच्या आयातीवरही सूट

▶️ औरंगाबाद: खुलताबादहून औरंगाबाद शहराच्या दिशेने येणाऱ्या कारला भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या कारची धडक; अपघातात 3 जण जागीच ठार तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक

▶️ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारपासून गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!