अमळनेर आर्मी स्कुलचा माजी विद्यार्थी अमित गायकवाड सेट परीक्षा उत्तीर्ण

अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलचा माजी विद्यार्थी व पाचोरा येथील रहिवासी अमित शरद गायकवाड हा सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने भौतिकशास्त्र विषयातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सेट परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन केले आहे. यासाठी त्यांना डॉ.आर.बी. पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने अमळनेर येथील आर्मी स्कुल दहावी पर्यंत चे शिक्षण, पाचोरा येथील एसएसएमएम कॉलेजमध्ये बी.एस्सी. ची पदवी तर जळगाव विद्यापीठ विभागातून एम.एस्सी. चे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या या यशाबद्दल माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, आर्मी स्कुलचे प्राचार्य पी.एम.कोळी, पीटीसी चेअरमन संजय वाघ , सातगाव येथील आश्रमशाळा चेअरमन प्रा.भागवत महालपुरे , मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे- पाटील, मुख्याध्यापक राहुल पाटील तसेच विजयनाना पाटील आर्मी स्कुलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शिवशाही फाऊंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे, सचिव तथा आर्मी स्कुलचे शिक्षक उमेश काटे यांनी ही अमित गायकवाड याच्या उज्वल यशाबद्दल कौतुक केले आहे.