जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस.चव्हाण यांची कृ.ऊ.बा.समितीस भेट!

पारोळा (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रस्तावित कोविड रुग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण यांनी भेट दिली व कोविड रुग्णालय उभारणी करण्याबाबत लगेच मान्यता देण्याचे आश्वासन दिले.परवानगी मिळाली की,लगेच युद्धपातळीवर रुग्णालयाचे काम सुरू करून येत्या दहा दिवसात मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी रुग्णालय सुरू होईल,असे कृषी बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी म्हटले. यावेळी संचालक प्रेमानंद पाटील,मधुकर पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे आदी उपस्थित होते
