बुधवार,21 एप्रिल 2021

▶️ लॉकडाऊनला अखेरचा पर्याय म्हणून पहावे, मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष्य केंद्रित करावे; राज्य सरकारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

▶️ अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली; FDA आयुक्तपदी आता परिमल सिंह

▶️ महाराष्ट्रात 6,83,856 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 32,13,464 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 61,343 रुग्णांचा मृत्यू

▶️ आयपीएल 2021 : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला दिले होते 138 धावांचे आव्हान; दिल्ली कॅपिटल्सने 4 बाद 138 धावा करत सामना घातला खिशात

▶️ राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान बँक खात्यांवर थेट ऑनलाईन देण्यात येणार; राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची माहीती

▶️ भारतात 21,50,119 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,32,69,863 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,82,570 रुग्णांचा मृत्यू

▶️ अयोध्यामध्ये रामनवमी: कोरोनामुळे यंदा अयोध्येत जल्लोष नाही, सीमाबंदी असेल; निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच 5-5 तुकड्या करून मिळणार श्री राम मंदिरात प्रवेश

▶️ अहमदनगरहून आता मराठवाड्यात ऑक्सिजन नाही; अहमदनगर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयांनाच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश

▶️ पुणे: कंपनीने दिलेले भेसळयुक्त खाद्य कोंबड्यांना दिल्याने कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले, पोलट्रीच्या मालकाची आर्थिक नुकसान झाल्याची लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार

▶️ ॲपल इव्हेंट 2021: आयफोन 12 सिरीजचे 4 फोन लॉन्च; आयफोन 12 मिनी जगातील सर्वात पातळ आणि हलका 5 जी स्मार्टफोन

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!