कोकीळाबाई रामपुरी गोसावी यांचे निधन

अमळनेर (प्रतिनिधी) नगाव (ता.अमळनेर) येथील माजी सरपंच कोकीळाबाई रामपुरी गोसावी (वय-७१) यांचे आज ह्रदयविकाराने निधन झाले. कोकीळाबाई गोसावी ह्या गेल्या ३० वर्षापासून ग्रामपंचायत सदस्या होत्या. ते सध्या उपसरपंच पदावर कार्यरत होत्या. त्या विकास संस्थेच्या अध्यक्षा तसेच रेशन दूकानाच्या संचालिका ही होत्या. पोलीस पाटील प्रविण गोसावी यांच्या त्या मातोश्री होत.