कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे कडून गेल्या १२ वर्षापासून रूढी-पंरपरेची जपवणूक!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तात्कालीन आमदार असतांना त्यांच्या संकल्पनेतून कार्य निर्माण केलेले अन् कायम नागरिकांच्या स्मरणात असलेलं शिल्प बळीराजा स्मारक आणि शिंदखेड राजा येथील जाधव वाड्याची प्रतिकृती असलेल्या जिजाऊ स्मारक मुळे अमळनेर शहराची अन् तालुक्याची आन,बाण अन् शान वाढलेली आहे.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील या स्मारकांची हिंदू रूढी परंपरांनुसार गुढी पाडवा, अक्षयतृतीया, दसरा, दिवाळी ( बळी प्रतिपदा) , शिवजयंती सह इतर सार्वजनिक सण, उत्सव दिवशी साफ सफाई, धुलाई, ध्वजारोहण, पुष्पहार अर्पण देखभाल अन् दुरुस्ती करणे आदी कामे स्वखर्चाने करून सार्वजनिक सण उत्सव यांची जतन, जपणूक करून आदर्श निर्माण केला आहे.
याकामी कार्यकर्ते विक्रांत बी. पाटील, रवींद्र पाटील, सुभाष भोई,ज्ञानेश्वर पाटील आदी नियमित सहकार्य करीत आहेत.
