मा.आ.शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान!

0

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचं आवाहन केल होत आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेर विधानसभा मतदार संघाचे मा.आ.शिरीष हिरालाल चौधरी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता याच दिनाचं औचित्य साधत कोरोनाच्या महाभयंकर संकटात देखील सामाजिक बंधिकली जपत रक्तदानाच महान कार्य करत समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने रक्तदान करून इतरांना मदत करण्याचा आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले तर यावेळी शिरीष दादा मित्र परिवाराने देखील रक्तदान करत माणुसकी धर्म निभावला.
सुजीत पाटील जे सदैव रक्तदान करत असतात तर राकेश साळी,रुतवीक भामरे,आबा महाजन व उदय खंडारे आदींनी रक्तदान केले तर पुढे बोलताना मा.आ. शिरीष चौधरी म्हणाले की, दर तीन महिन्यांनी रक्तदान केले पाहीजे शरीराला फायदेच होतात.रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले, तर शहरातील रक्तदान चळवळ राबवणारे मनोज शिंगाणे यांच्या कार्याचा त्यांनी तोंडभरून कौतुक केले. परिस्थिती कितीही नाजुक असली तरी रक्ताची कमतरता भासणार नाही असे सामाजीक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!