टायगर स्कुल मध्ये विद्यार्थ्यांवर झाले “पर्यावरण संस्कार”

300 विद्यार्थ्यांनी घेतला सिडबॉल्स कॅम्पेन मध्ये सहभाग
पारोळा (प्रतिनिधी) टायगर इंटरनॅशनल स्कुल मार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी “पर्यावरण संस्कार” उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरात सुरु असलेल्या सिडबॉल्स कॅम्पेन साठीचा प्रतिसाद म्हणून तब्बल 300 विद्यार्थ्यांनी माती आणि खत मिश्रणात बनवलेल्या प्लांट मध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त बिया रोपण करून त्याची संगोपन जबाबदारी देण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तथा वक्ता म्हणून सिडबॉल्स कॅम्पेनचे समन्वयक राहुल निकम,शितल अकेडमीचे रवी पाटील सर , मुख्याध्यापक शेख सर , शितल अकॅडमी चे प्रिन्सिपल विशाल पाटील सर, गव्हर्नमेंट आयटीआयचे प्रा.सुनील चौधरी सर व्यासपीठावर उपस्थित होते.
वृक्षाला पाणी देऊन या संस्कार वर्गाचे उदघाटन करण्यात आले.
टायगर स्कुल कडून विद्यार्थ्यांना प्रत्येकी खत मातीचे पॉट करून देण्यात आले होते,त्यात प्रत्येक मुलाकडून उपयुक्त वृक्षाच्या बिया रोपण करून त्याच्या संगोपन ची माहिती देऊन सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी वृक्षचे मानवी जीवनातील महत्व रवी पाटील सर यांनी समजावून सांगितले. त्याचबरोबर “पर्यावरण व मानव” या विषयावर राहुल निकम यांनी मार्गदर्शन केलं. या प्रकारचे उपक्रम हेच मानवाला भविष्यात उपयुक्त पडतील आणि याप्रकारच्या बालवयात संस्कारातून घडलेले विद्यार्थी उद्याचा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीसाठी कवच म्हणून उभे राहतील अशी भावना यावेळी व्यक्त केली. यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
सतत उपक्रमशील असलेल्या टायगर स्कुलच्या या उपक्रमाचे पालक तथा शहरवासीयां तर्फे कौतुक करण्यात येत आहे.