विद्यार्थ्यांनो… स्पर्धा परीक्षेत पुर्ण ताकदीने उतरा!-सुदाम महाजन

🟥अमळनेरला गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण
अमळनेर (प्रतिनिधी) सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. स्वतः ला सिद्ध करायचे असेल तर भरपूर मेहनत जिद्द, चिकाटी ठेवावी लागेल. पर्यायाने तुमचे हे यश कोणीही रोखू शकत नाही असे मत निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी व्यक्त केले. प्रा डॉ एस.ओ.माळी आणि प्रतापीयन्स परीवार तर्फे आयोजित स्व.निळकंठ ओंकार माळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या व्याख्यान, सामान्य ज्ञान स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.
जी.एस.हायस्कूलचे मुख्याध्यापक डि.एच.ठाकूर हे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी माजी उपप्राचार्य डॉ एस.ओ.माळी, राज्य कर उपआयुक्त मधुकर पाटील (जळगांव) व आर्मी स्कुलचे उपक्रमशील शिक्षक उमेश काटे, निवृत्त बँक अधिकारी एम ओ माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मधुकर पाटील यांनी सांगितले की, गोष्टीमधून फक्तं अन फक्तं आनंद मिळतो. यशामागे कष्ट व मेहनतीचा मोठा भुतकाळ असतो. स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून द्या. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यशोशिखरावर सहज पोहचता येते. डि.एच ठाकूर म्हणाले की, यश प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एस.ओ.माळी यांनी केले. तर सुत्रसंचालन डि.ए.धनगर यांनी केले. व्ही ए पवार यांनी आभार मानले.
🟥 स्पर्धेचा निकाल असा..
प्रथम-उदय सोनार, द्वितीय-सुशिल धनगर, तृतीय-निलेश कुंभार,राजश्री सोनवणे, उत्तेजनार्थ- दिनेश चौधरी, चेतन महाजन, अभिषेक संदानशिव,अतूल राजपूत यांना सन्मानपत्र व रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पोष्टमास्तर राहुल पाटील यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल घोषित केला. या परीक्षेला सुमारे ३०० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. स्पर्धा परीक्षा पेपर सेटर आरती साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच, सीसीएमसी स्पर्धा परीक्षा केंद्र, पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, खानदेश साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी दिलीप शिरसाठ, पोस्ट मास्तर राहुलकुमार पाटील, स्वर्णदीप राजपूत, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक राहुल चव्हाण, आशिष राजपूत, ग्रामसेवक सुधाकर धोबी, एम.एस.इ.बी चे विशाल जाधव, जितेंद्र भोई, समाधान पारधी, सचिन पाटील, कैलास पाटील, आरती साळुंखे, गिरीश माळी, मोहित मावळे, अनिकेत भामरे, भावेश सोनवणे आदींनी सहकार्य केले.