आंचळगाव वि.का. संस्थेची चेअरमनपदी डॉ. संजीव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ पाटील

भडगाव- आंचळगाव (ता.भडगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी डॉ. संजीव कृष्णराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ उखा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीच सन-२०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठीची संचालक पदाची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. बिनविरोधची परंपरा कायम ठेवत ही निवड पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालक जयवंतराव हनुमंतराव पाटील, सुभाष यादव पाटील, संतोष महारु पाटील, बाळू हिरालाल पाटील, शिवाजी उखा पाटील, योगेश भगवान पाटील, लक्ष्मण ओंकार पाटील, धर्मा नारायण पवार, अशोक समरत निकम, रंजना प्रकाश पाटील व शांताबाई रामराव बिडवे आदी उपस्थित होते. यावेळी चेअरमन डॉ. संजीव पाटील, व्हाईस चेअरमन विश्वनाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून उत्पन्नाचे स्रोत वाढवले जातील. परिणामी शेतकरी हिताची कामे करून संस्था प्रगतीपथावर नेणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.