जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील पाडळसरे दौऱ्यावर!

0

शहरात होणार राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी)

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून ते अमळनेर मतदारसंघाला भेट देणार आहेत. ही विशेष बाब या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी हितगूज साधणार आहेत.

गुरुवारी सकाळी 10 वा 45 मि. नी. शिरपुर येथून पाडळसरे अमळनेर येथे सकाळी 11 वा 30 ते 12.00 वाजता येथे आगमन व निम्न तापी प्रकल्प भेट, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत  दुपारी 12 ते 12. 45 वाजता. बैठक व चर्चा यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी 12 वा 45 ते 2.00 वाजेपर्यंत अमळनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक व आढावा परिसंवाद.

दुपारी 2.00  ते 3.00 वाजता आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता अमळनेर येथून पारोळ्याकडे प्रयाण. दुपारी 3 वा. 30 मि.नी पारोळा येथे आगमन  दुपारी 3 वा 30 ते 4 वा 15 मि.नी  एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी 4.15 वा पारोळा येथून पाचोराकडे प्रयाण. सायं 5 वा 30 ते 6 पाचोरा येथे आगमन व पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायं 6 वा 15 वाजता  पाचोरा येथून जामनेरकडे प्रयाण, सायं 7 वा 30 ते 8 वा 05 मि.नी जामनेर येथे आगमन व जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक.  रात्री 8 वा. 15 मि. जामनेर येथून जळगावकडे प्रयाण, रात्री 9 वा. 15 मि जळगाव येथे आगमन व मुक्काम.

अमळनेर मतदारसंघातील प्रवास – शिरपूर येथून बेटावद मार्गे ब्राम्हणे फाटा, भिलाली, शहापूर तांदळी फाटा, कळमसरे व येथून नवीन पाडळसरे वसाहत ते धरण क्षेत्रावर तेथून कार्यक्रम आटोपल्यावर तेथून कळमसरे मारवड अमळनेर उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कार्यक्रम. तेथून आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी राखीव.

          परिसंवाद कार्यक्रमात सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे सेल फ्रंटल आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सचिन पाटील,  कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवाजीराव पाटील, रणजित पाटील, शहराध्यक्ष बाळू पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव,  महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, आशा शिंदे, भावना देसले, भारती शिंदे, अलका गोसावी, अनिता भालेराव आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!