वासुदेव साळुंखे यांचे निधन;गुरुवारी अंत्ययात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) मारवड (ता.अमळनेर) येथील माजी सरपंच वासुदेव मन्साराम साळुंखे उर्फ भिकन बापु (वय-७५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी (ता.२४) सकाळी अकराला मारवड येथील राहत्या घरापासून निघणार आहे. ते मारवड ग्राम विकास शिक्षण मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयवंतराव पाटील व संचालक डॉ. सुरेश साळुंखे यांचे मोठे बंधू तर प्रा. प्रशांत साळुंखे, ग्राम विकास अधिकारी दिनेश साळुंखे व साने गुरुजी पतसंस्थेचे चेअरमन तथा माध्यमिक शिक्षक सचिन साळुंखे यांचे वडील होत.